Tuesday, 13 September 2022
Wednesday, 6 July 2022
2.1 You Start Dying Slowly
2.1 You Start Dying Slowly...
(Coursebook pages 41 to 46)
Introduction: This is a poem by the famous Chilean poet Pablo Neruda. This is a 'didactic' poem in the very positive sense of the term. Unlike the many didactic poems imparting worn-out pieces of advice, this poem very much appeals to the modern sensibilities. The poem reminds us once again the age-old wisdom that life must flow and renew itself at every moment of its being. According to the poet, we must not be stagnant, repetitive or conventional in the way we lead our lives.
The poet reminds us that if we kill our self esteem (= the feeling of being happy with one's own character and abilities) or we do not let others to help us, then also we start dying slowly.
In the poet's view, if one becomes a slave of one's habits or ends up doing the same thing day after day without even bothering to change the routine, then one starts dying slowly.
This is also true if we do not wear different colours or if we do not dare to speak to strangers. The poet warns up that if we avoid strong feelings (= passions) and unsteady (= turbulent) emotions which bring a sparkle to our eyes and make our hearts beat fast, then also we start dying slowly.
According to the poet, we start dying slowly if we do not change our life when we are not satisfied with our job or love. We also start dying slowly if we do not show the courage to risk something safe for something uncertain. If we do not go after a dream or if we do not allow ourselves to ignore a sensible advice at least once in our lifetime, even then we start dying slowly.
आणि आपण हळुहळू संपून जाऊ/नष्ट होत जाऊ... आयुष्य भरभरून का व कसे जगले पाहिजे याविषयी या कवितेतून कवी आपले मनोगत व्यक्त करतात,
आपण जर प्रवास केला नाही, आजूबाजूचे जग पाहिले नाही, चांगले वाचन केले नाही किंवा सभोवतालचे आवाज (जगण्याचे ध्वनी) ऐकण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, तर आपण खऱ्या अर्थाने जीवन जगलोच नाही असे म्हणावे लागेल...
आपण स्वतःला ओळखले नाही, स्वतःमधील गुणांची कदर केली नाही, तर आपली ओळख हरवून जाईल, आपले स्वत्व नाहीसे होत जाईल,
आणि आपण हळूहळू संपून जाऊ, नष्ट होत जाऊ... आपणच जर आपला आत्मसन्मान जपला नाही, स्वतःला कमी लेखत राहिलो,
इतरांनी पुढे केलेला मैत्रीचा, मदतीचा हात अव्हेरत राहिलो, आणि आपण हळूहळू संपून जाऊ, नष्ट होत जाऊ.... आपल्या नकळत आपण सवयींचे गुलाम बनत राहिलो, आणि त्याची जाणीव होऊनही रोजच्या दिनक्रमात कधी बदल केला नाही,
तर आपले आयुष्य एकसुरी, निरस होईल.
कधी वेगवेगळे रंग परिधान केले नाहीत, नवे रूप धारण केले नाही,
ठराविक आवडीनिवडींच्या बंदिस्त चौकटीतून स्वतःला मुक्त केले नाही, किंवा अनोळखी लोकांशी कधी संवाद साधला नाही,
तर आपण हळूहळू संपून जाऊ, नष्ट होत जाऊ... पुढील ओळींतून कवी आपल्याला जाणीव करून देतात की, मनातील उत्कट भावनांना जर मुक्तपणे आपण व्यक्त होऊ दिले नाही, त्याचा आनंद दिला घेतला नाही, तर आपल्या भावना बोथट होत जातील.
क्षणार्धात डोळ्यांत चमक आणणाऱ्या किंवा हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या, सुखद भावनांचे हिंदोळे जर कधी अनुभवले नाहीत, तर आपण हळूहळू संपून जाऊ, नष्ट होत जाऊ...
हाती असलेल्या कामातून जर आनंद, समाधान मिळत नसेल, किंवा जोडीदाराच्या नात्यातील प्रेम हरवत चालले आहे, असे वाटत असले,
आणि तरीही आपण आयुष्य तसेच निरिच्छपणे रेटत राहिलो, आयुष्य सुकर व्हावे यासाठी काही प्रयत्न केले नाहीत, तर आपण खऱ्या अर्थाने जीवन जगलोच नाही असे म्हणावे लागेल....
सुरक्षित आयुष्य जगताना कधी धोका पत्करायची हिंमत दाखवली नाही, स्वतःला अनिश्चित गोष्टींचे आव्हान दिले नाही, किंवा कधी एखादया स्वप्नाचा पाठपुरावा केला नाही, तरी आपण अनेक उत्तम गोष्टी करण्यापासून स्वतःला वंचिक ठेवू.
म्हणून कवी सुचवतात की आयुष्यात किमान एकदा तरी स्वतःच्या समंजस, शहाण्या मनाला उपदेशांच्या नियमांच्या बंधनातून मुक्त करावे आणि आयुष्य भरभरून जगण्याचा अपरिमित आनंद लुटावा.
You Start Dying Slowly...
If you do not travel,
If you do not read,
If you do not listen to the sounds of life,
If you do not appreciate yourself.
You start dying slowly...
When you kill your self-esteem;
When you do not let others help you.
You start dying slowly...
If you become a slave of your habits,
Walking everyday on the same paths…
If you do not change your routine,
If you do not wear different colours
Or you do not speak to those you don’t know.
You start dying slowly...
If you avoid to feel passion
And their turbulent emotions;
Those which make your eyes glisten
And your heart beat fast.
You start dying slowly...
If you do not change your life
when you are not satisfied with your job,
or with your love,
If you do not risk what is safe, for the uncertain,
If you do not go after a dream,
If you do not allow yourself,
At least once in your lifetime,
To run away from sensible advice…
- Pablo Neruda
Friday, 3 June 2022
1.3 Appreciation - Basketful of Moonlight
(1) Title: The title of the poem is "Basketful of Moonlight."
(2) The name of the Poet: The name of the poet is Sunil Sharma.
(3) Rhyme Scheme: There no rhyme scheme in this poem. This a poem is in 'free verse.'
(4) Figure of Speech: Repetition, alliteration, apostrophe.
1.3 Paraphrase - Basketful of Moonlight
1.3 Basketful of Moonlight
Introduction:
This is an English translation of a poem written in Dogri language. In the poem, a small child in a village wants his father to return early and safely from the city to tell him stories. So he requests the moon to give seeds of moonlight to sow them to lighten the dark route from the city to his village.
Paraphrase
The speaker of the poem, a small child, requests the moon to give him moonlight. He wants a basketful or two baskets full of moonlight with seeds of moonlight. The child wants to sow the seeds of moonlight on the sides of the path that leads to his village from the city. He wants to sow many, many small moons of light all along the path.
According to the child, the whole village (= the entire working population of the village) goes to the city for work. By the time of their return to the village, it becomes quite dark as his village is quite far off from the city. Moreover, the route to the village is tough and full of snakes and scorpions. Still the villagers have to tread the same path as there is no cart or bus service.
In the case of the child, the speaker of the poem, he is always asleep by the time his father returns home from work. Then again, the father leaves early for work in the morning, while the child is still asleep. So the child repeats his requests for a basketful of moonlight on loan.
The child wants to light the dark route to his village so that his father can return early in the evening. Like any other child, he too wants to hear fairy tales and stories from his father.
To conclude, the child again earnestly requests the moon to give a basketful of moonlight so that he can sow the seeds of moon on the sides of the path that leads to the village from the city.
टोपलीभर चंद्रप्रकाश
अरे चंद्रा, मला तुझा प्रकाश दे, एक दोन टोपल्या भरून तुझा चंद्रप्रकाश दे,
आणि थोड्या चंद्रप्रकाशाच्या बियाही त्यात घाल.
शहरातून माझ्या गावाकडे येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना, प्रकाशाचे खूप सारे छोटे छोटे चंद्र पेरायचे आहेत मला. रोज सगळा गाव (नोकरवर्ग/कर्मचारी) कामासाठी शहराकडे जातो,
मात्र परतताना वाटेवरती मिट्ट काळोख होतो..
गाव आहे माझा खूप दूर, रस्ता खाचखळग्यांचा आणि विंचवा
सापांनी भरलेला पण बस नाही धावत,
की कुठली गाडीही नाही येत त्या रस्त्यावरून.
बाबा घरी परततात उशिरा तोवर झोपी गेलेला असतो मी.
भल्या सकाळी ते पुन्हा कामावर जातात, तेव्हा गाढ झोपेत असतो मी.
म्हणून कवितेतील मुलगा पुढे म्हणतो,
अरे चंद्रा, तुझा टोपलीभर चंद्रप्रकाश मला उधार दे,
म्हणजे गावाकडे येणारा रस्ता मी उजळून टाकीन
आणि माझे बाबा घरी लवकर परत येऊ शकतील.
कारण मलाही त्यांच्याकडून ऐकायच्या आहेत पऱ्यांच्या कथा आणि खूप साऱ्या गोष्टी.
चंद्रा, तुझा टोपलीभर चंद्रप्रकाश मला दे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रकाशाच्या बिया मला पेरायच्या आहेत.
Thursday, 2 June 2022
Appreciation - A Teenager's Prayer
(1) Title: 'A Teenager's Prayer'.
(2) The name of the poet : J. Morse.
(3) Rhyme scheme: The rhyme scheme of the poem is 'abcb.'
(4) Figure of speech (Any 1) : Apostrophe, Inversion, Metaphor.
(5) Theme/Central idea:
The theme of the poem is a teenager's dilemma about making the right decisions. The responsibility of choice falls fully on him/her. A wrong decision may ruin the whole life. Hence the teenager in the poem prays to God for His help and guidance.
Saturday, 28 May 2022
what is appreciation?
Appreciation of Poem
इयत्ता दहावीच्या इंग्रजीच्या कृतिपत्रिकेच्या आराखड्यानुसार Q. 3 (B) हा दिलेल्या कवितेवर आधारित 'Appreciation of poem' असा 5 गुणांचा प्रश्न विचारला जाणार आहे. या प्रश्नाचे उत्तर कशा प्रकारे दयायला हवे, याचे मार्गदर्शन पुढे दिले आहे :
कवितेचे appreciation (रसग्रहण) म्हणजे काय ?
एखादया कवितेचे appreciation म्हणजे, त्या कवितेची रचना, विषय, आशय, कवितेत मांडलेले विचार, भावना, प्रसंग, शब्दयोजना, भाषाशैली, भाषिक अलंकार इत्यादी वैशिष्ट्ये ओळखून त्यांतील उत्तम गुणांचा आस्वाद/आनंद घेणे. कवितेतील आनंद देणाऱ्या विविध अंगांचे/घटकांचे वर्णन, त्यांचा तुमच्यावर पडलेला प्रभाव, त्या कवितेतील कोणते गुणविशेष तुम्हांला भावले, इत्यादींविषयी तुमचे विचार, भावना, कविता समजून घेऊन व्यक्त करणे महत्त्वाचे असते.
पुढील 5 मुद्द्यांनुसार कृतिपत्रिकेत दिलेल्या कवितेचा रसास्वाद/ रसग्रहण करणे अपेक्षित आहे :
(1) Title : सर्वप्रथम कवितेचे शीर्षक लिहावे. (५ गुण)
(2) Name of the Poet: त्यानंतर कवी/कवयित्रीचे नाव लिहावे. काही कवितांखाली असे नाव नसते, तेथे 'anonymous' असे दिलेले असते. याचा अर्थ एखादया 'अज्ञात' (unknown) व्यक्तीने ती कविता लिहिलेली असते. (½ गुण)
(3) Rhyme Scheme Rhymes (यमक) कवितेतील प्रत्येक ओळीच्या अखेरीस येत असतात. त्यांचे ध्वनी (उच्चार) सारखे असतात. उदा., blow show, love-above, etc. या Rhyming words ची रचना कडव्यात विशिष्ट नियमितसाच्यात/नमुन्यात येत असते. कडव्यातील नियमित यमक योजनेला 'Rhyme Scheme' असे म्हणतात. Rhyme Scheme aa, bb, ce' इत्यादी अक्षरांचा उपयोग करून लिहावी लागते. या यमक योजनेविषयीची माहिती तुमचे शिक्षक करून देतील, ती चांगली लक्षात ठेवा. ज्या कवितेतील ओळींत यमक जुळणारे शब्द वापरलेले नसतात, त्या कवितेस Free Verse (मुक्त छंद) असे लिहावे.(1 गुण)
(4) Figure of Speech (भाषिक अलंकार) :(Any one)( 1 गुण)
कवितेचे भाषासौंदर्य वाढवण्याकरिता कवी आपले विचार, कल्पना इत्यादी प्रभावीपणे मांडण्याकरिता सर्वसामान्य भाषा वापरण्याऐवजी वेगळ्या अशा अलंकारिक भाषेचा उपयोग करतात. दहावीच्या कवितांत प्रामुख्याने
Simile (उपमा),
Metaphor (रूपक),
Inversion (व्युत्क्रम)
Personification (चेतनगुणोक्ती),
Antithesis (विरोधाभास),
Apostrophe (परोक्ष संबोधन),
Alliteration (अनुप्रास)
Repetition (पुनरावृत्ती)
Hyperbole (अतिशयोक्ती)
या Figures of Speech चा उपयोग केलेला आहे. मार्गदर्शकात दहावीच्या प्रत्येक कवितेतील Figure of Speech ची उदाहरणे, त्या त्या कवितेखाली दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांत दिली आहेत; ती चांगली लक्षात ठेवा.
(5) Theme / Central Idea: (कवितेचा विषय /मध्यवर्ती कल्पना)(2 गुण)
दिलेल्या कवितेचा मुख्य गाभा/विषय, त्या कवितेतील मुख्य कल्पना, मुख्य विचार किंवा घटना लक्षात घेऊन विद्याथ्र्यांना 2-3 ओळींत मध्यवर्ती कल्पना लिहायची असते. कवीला कोणता महत्त्वाचा / मुख्य विषय अभिप्रेत आहे, हे मध्यवर्ती कल्पनेतून समजते. याकरिता मार्गदर्शकात कवितेपूर्वी दिलेला 'Paraphrase' (कवितेचा सारांश) हा भाग लक्षपूर्वक वाचा..
1.1 Teenager's Prayer Paraphrase
Paraphrase
Each day brings new beginnings along with it.. So at the beginning of each day I must make my own decisions. There are different paths lying before me; but to choose the road on which to travel, is solely my responsibility.
From those different roads lying before me,
I can choose the road of life that leads to great success. Or else, I can travel down the path of evil (=darkened) which leads to great worry and strain (=distress).
In the third stanza the speaker of the poem (the teenager) directly addresses the Almighty God (Lord). He pleads to the Lord to open up his eyes so that he might see clearly. He also prays to God to help him stand for what is right and to bring out the best in him.
The speaker goes on to seek God's help to enable him to say 'no' when he is faced with situations where he may overcome by a strong desire to do something bad or wrong. The speaker also prays for God's blessings so that he might keep his body clean and fit to face the challenges of life each day.
In the final stanza the speaker concludes that by the time his/her teenage years are over, he/she will surely know the truth that the life lived very best is always the one which is lived under the constant guidance of Almighty God (=with you walking next to me).
कवितेचा भावार्थ
एका किशोरवयीन बालकाची प्रार्थना
येणारा प्रत्येक दिवस एक नवी सुरुवात घेऊन येत असतो. या प्रत्येक दिवशी मी जे काही करीन त्या सर्व गोष्टींचे निर्णय मलाच घेतले पाहिजेत. माझ्यासमोर अनेक पर्याय असतील, अनेक वाटा मला दिसतील, मात्र त्यातली कोणती वाट निवडायची हे माझे मलाच ठरवायचे आहे.
मी निवडलेला माझ्या आयुष्याचा मार्ग (निर्णय) मला उत्तुंग यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवेल किंवा कदाचित अपयशाच्या/ अधोगतीच्या वाटेकडेही घेऊन जाईल, परंतु त्या निर्णयाची जबाबदारी पूर्णपणे माझी असेल.
हे देवा, या जगात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पाहता, अनुभवता याव्यात अशी दृष्टी मला दे. जे योग्य आहे, न्याय्य आहे, त्यासाठी ठामपणे मला उभे राहता यावे आणि माझ्यातील सर्वोत्तम गुणांना योग्य दिशा देता यावी यासाठी मला मदत कर.
एखादया मोहाच्या क्षणी अथवा कठीण प्रसंगी माझ्याकडून अयोग्य वर्तन घडू नये यासाठी ठामपणे नकार देण्याची देवा मला हिंमत दे आणि आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी माझे शरीर (आरोग्य) मी कायम उत्तम, निरोगी ठेवू शकेन यासाठी शक्ती दे.
किशोरवयाचा हा काळ सरताना मला खात्री आहे की तुझी साथ असेल, तुझे आशीर्वाद पाठीशी असतील तर आयुष्याची वाटचाल अतिशय सुखद आणि सुकर होऊ शकते याची मला सदैव जाणीव असेल.