Thursday, 2 July 2020

Be Smart...!

Be SMART...!

Champions aren't made in gyms.क्रीडा स्पर्धा तील विजेते व्यायाम शाळेमध्ये बनत नाहीत.  Champions are made from something they have deep inside them -a desire, a dream, a vision. दृढ इच्छा, स्वप्न, दूरदृष्टी यांसारख्या त्यांच्यामध्ये खोलवर असलेल्या काही गोष्टींमुळे विजेते निर्माण होतात.  They have to have the skill and the will. But the will must be stronger than the skill.कौशल्ये व इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी त्यांच्यात असणे अनिवार्य आहेच पण कौशल्याहूनही इच्छाशक्ती बळकट असायला हवी.  Successful professionals thrive in the same manner. किल्या यशस्वी व्यावसायिकांचा अशा प्रकारे उत्कर्ष होतो.  We all have natural talents.आपण सर्वचजण उपजत बुद्धिकौशल्य घेऊन जन्माला येतो.  If we use that talent to set our goal in life, we can easily get success in life.  या बुद्धीकौशल्याचा जर आयुष्यातील ध्येय मिळवण्यासाठी योग्य प्रकारे उपयोग केला तर आपण निश्चितच जीवनात यशस्वी होऊ शकतो.  We shall not achieve our goals if we do not take action to achieve them.
अर्थात ध्येये पूर्ण करण्यासाठी आपण कृती केली नाही, तर मात्र ती पूर्ण होऊ शकणार नाहीत.

Setting goals has two valuable assets - a sense of originality and a stepping stone to illuminate the path. ध्येय निश्चित करताना दोन महत्त्वपूर्ण पेलू लक्षात घेतले पाहिजेत-कल्पकतेची समज/ नवनिर्मितिक्षमतेची जाणीव आणि ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी (प्रकाशमान करणारा मैलाचा दगड.)   Goal put one at the helm of life; pursuing them acknowledges a better future situation.ध्येयांमुळे व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे हाती घेऊ शकते; आणि त्यांचा पाठपुरावा केल्यामुळे उज्ज्वल भविष्याची शाश्वती मिळते.   They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen.

Setting goals may appear easy, but, for some, it is quite challenging. ध्येय निश्चित करणे वरकरणी सोपे वाटत असले तरी कित्येक जणांसाठी ते अतिशय आव्हानात्मक असते. Fear of failure may be avoided in the absence of any goals.  कोणतेही ध्येय नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. ध्येय साध्य करायचे असेल तर या पाच टप्प्यांचा मार्ग अवलंबावा असे तज्ज्ञ लोक सुचवतात.
 After all, one has to decide what one wants to achieve in the end.मात्र शेवटी आयुष्यात काय मिळवायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.   To accomplish goals, experts recommend a five step approach.


 ध्येय समोर असेल तर आयुष्याची गाडी रुळांवरून न घसरते / जीवनरूपी नोका न भरकटता ठरवलेल्या सुरळीत मार्गावर पुढे नेता येते.




SMART goals are a methodology of thinking that helps people reach success. SMART stands for specific, measurable, achievable, realistic and time bound.

SMART goals have a specific rubric:

Specific: Involves identifying a specific area for improvement. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. It makes it easier to set parameters and work towards the goal. For example, if it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch?

Measurable: Quantifying goals provides specific ways to track progress against goals. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. While playing football, one's exact role and position has to be clearly defined

Achievable: Setting goals that can be completed in the designated period of time. Often, these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. As students, we can't become a President, a Prime Minister, but can hope to reach those heights in future.

Realistic: It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise.

Building expertise takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic.

Being realistic will make it easy to be successful at attaining goals. If defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture

Time-bound: Establish time parameters around each goal, as it will help increase focus and accountability.Time-bound (काल-मर्यादित) : प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित करावे, ज्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास मदत होईल. To reduce weight we know how to go about it.वजन कमी करायचे असल्यास का् करायला हवे हे आपल्याला माहीत असते. But without consistent time-bound action, it never becomes a reality.पण वेळेच्या चौकटीत राहून सातत्यपूर्ण कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळवणे शक्य होत नाही;  It may be exercise, diet and stress-free thoughts.मग तो नियमित व्यायाम असो, आहार असो की तणावरहित विचार. All these have to be practised and implemented without hesitation, doubt or indifference, but within a deadline.मनाची दुविधावस्था न होऊ देता, मनामध्ये शंका किंवा उदासीनता न बाळगता, ठरवलेल्या मुदतीत काटेकोरपणे या सर्व गोष्टींचे पालन केले पाहिजे.
Visions, wishes, intentions and dreams are all valuable.सर्वच ध्येयदृष्टी, इच्छा, उद्देश आणि स्वप्ने हो मौल्यवान असतात,  They spark off imagination and encourage us to define where we want to reach..त्यांच्यामुळे आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि नेमके कुठे पोहोचायचे आहे, In order to get there, however, we need to bring life images, down to earth and plan to execute our strategies ते ठरवण्यासाठी प्रोत्साहन मिळते.तिथे पोहोचण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या मनातील प्रतिमा व्यावहारिक पातळीवर कृतीत उतरवता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार धोरण आखता आली पाहिजेत. 
 The quality and quantity of energy we put forth, directly impact the results.आपण वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण यांचा निष्पत्तीवर परिणाम होत असतो.
Life is something like a trumpet.आयुष्य हे एखादया रणशिंगाप्रमाणे तुतारीसारखे असते. If we don't put anything in, we can't get anything out.आपण त्याला काही दिले नाही, तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही.
Success is a walk in the dark.यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल. Finding the right footing, precisely mastering the skills and getting to the next place, योग्य पाऊलवाट शोधणे, आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे all depend on how we approach and tackle the problem.या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो यांवर अवलंबून असतात. The best way to get from where we are, to where we want to be is to find the footing of our next step.आपण जिथे आहोत तिथून जिथे जाण्याची इच्छा आहे. तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकता येणे. When we take the next step, it should support and hold us without a crack.. आपण उचललेले प्रत्येक पुढचे पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारे असायला हवे.

 
 




यशस्वी बना!

क्रीडा स्पर्धा तील विजेते व्यायाम शाळेमध्ये बनत नाहीत. दृढ इच्छा, स्वप्न, दूरदृष्टी यांसारख्या त्यांच्यामध्ये खोलवर असलेल्या काही गोष्टींमुळे विजेते निर्माण होतात. कौशल्ये व इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी त्यांच्यात असणे अनिवार्य आहेच पण कौशल्याहूनही इच्छाशक्ती बळकट असायला हवी. किल्या यशस्वी व्यावसायिकांचा अशा प्रकारे उत्कर्ष होतो. आपण सर्वचजण उपजत बुद्धिकौशल्य घेऊन जन्माला येतो. या बुद्धीकौशल्याचा जर आयुष्यातील ध्येय मिळवण्यासाठी योग्य प्रकारे उपयोग केला तर आपण निश्चितच जीवनात यशस्वी होऊ शकतो. अर्थात ध्येये पूर्ण करण्यासाठी आपण कृती केली नाही, तर मात्र ती पूर्ण होऊ शकणार नाहीत.








SMART goals-स्मार्ट ध्येय ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी विचारपद्धती आहे. SMART म्हणजे-Specific (विशिष्ट), Measurable (मोजता येण्याजोगा), Achievable (प्राप्त करण्यायोग्य), Realistic (वास्तववादी) आणि Time-bound (काल-मर्यादित).

SMART ध्येयांची एक मार्गदर्शक सूची असते, ती अशी :

Specific (निश्चित तपशील असलेला) : सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यात शोध घेतला जातो. क्षेत्र जितके अधिक नेमके, तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकते. यामुळे मापदंड ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे सोपे जाते. उदाहरणार्थ,

एखादे घर बांधताना किती क्षमतेचे घर हवे आहे आणि किती कालावधी लागेल यांबद्दल माहीत असणे गरजेचे असते.

Measurable (मोजता येण्याजोगा) : ध्येयाचे परिमाण निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आखता येतात. त्यामुळे ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीतील कामगिरीचे मानक ठरवता येतात तसेच सुधारणेच्या संघीही शोधणे सोपे होते.

फुटबॉल खेळताना, खेळाडूची भूमिका व त्याचे (मैदानावर) स्थान निश्चित केलेले असणे आवश्यक असते.

Achievable (प्राप्त/साध्य करण्यायोग्य) : उरावी कालावधीत पूर्ण करता येतील अशी ध्येये ठरवावीत. अशी विस्तृत ध्येये पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मैलाचा दगड बनण्याचे काम करतात, ज्यातून कित्येकदा भविष्यातील कारकीर्द ठरू शकते.

कदाचित आपण राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री बनू शकणार नाही परंतु एखादा मोठा सामाजिक कार्यकर्ता बनून प्रभावी कार्य करण्याचे स्वप्न नक्कीच पाहू शकतो.

Realistic (वास्तववादी) : स्वत:ला अवगत असलेल्या कोशल्यानुसार व क्षमतेप्रमाणे ध्येय निश्चितं करणे महत्त्वाचे असते.

कोणत्याही गोष्टीत प्रावीण्य मिळवण्यासाठी वेळ दयावा लागतो, त्यामुळे कमी कालावधीत एखादया विषयात पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणे अवास्तव आहे. वास्तववादी दृष्टिकोन असेल तर ध्येय साध्य करणे सहज शक्य होते. बचावात्मक असणारे आणि पहाडी नसलेले ध्येय बहुघा वास्तववादी नसते. आपल्या डोक्यात (ध्येयाचे) चित्र स्पष्ट असायला हवे आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही असली पाहिजे.

Time-bound (काल-मर्यादित) : प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित करावे, ज्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास मदत होईल.

वजन कमी करायचे असल्यास का् करायला हवे हे आपल्याला माहीत असते. पण वेळेच्या चौकटीत राहून सातत्यपूर्ण कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळवणे शक्य होत नाही; मग तो नियमित व्यायाम असो, आहार असो की तणावरहित विचार.

मनाची दुविधावस्था न होऊ देता, मनामध्ये शंका किंवा उदासीनता न बाळगता, ठरवलेल्या मुदतीत काटेकोरपणे या सर्व गोष्टींचे पालन केले पाहिजे.

सर्वच ध्येयदृष्टी, इच्छा, उद्देश आणि स्वप्ने हो मौल्यवान असतात, त्यांच्यामुळे आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि नेमके कुठे पोहोचायचे आहे, ते ठरवण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

तिथे पोहोचण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या मनातील प्रतिमा व्यावहारिक पातळीवर कृतीत उतरवता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार धोरण आखता आली पाहिजेत. आपण वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण यांचा निष्पत्तीवर परिणाम होत असतो.

आयुष्य हे एखादया रणशिंगाप्रमाणे तुतारीसारखे असते. आपण त्याला काही दिले नाही, तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही.

यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल. योग्य पाऊलवाट शोधणे, आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो यांवर अवलंबून असतात.

आपण जिथे आहोत तिथून जिथे जाण्याची इच्छा आहे. तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकता येणे. आपण उचललेले प्रत्येक पुढचे पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारे असायला हवे.

ENGLISH WORKSHOP
1. Complete the following web with the words associated with the text and the
given title.
- Components of Success :- 1...........2..........3..........4...........5..........6..........7..........9...........

2. (A) Pick out examples from the text that support each of the following facts :
(a) Goals should be achievable.
.
(b) A time-limit should be set to achieve goals.
.
(c) A specific field/area has to be fixed to achieve goals.

(d) Good results depend upon the quality and quantity of work put in.
.
(e) A benchmark is needed to track progress.
.
3. Complete the following sentences.
(a) SMART goals are......................
(b) Two valuable assets of setting goals are.....................

4. Read this quote.
‘If we don’t put anything in, we can’t get anything out.’ Guess the meaning.
Discuss in pairs and find similar quotes that bring in the same meaning.
:- 
(a) You reap as you sow
(b) Input is equal to output
(c)....................
(d)....................
(e).......................
5. Drafting a Speech. Discuss in groups each block and make notes about it.

6. Speech development

(A) Content
(a) Greeting and introduction of the topic
(b) Exposition of main theme / clarity of message / organised thoughts and ideas.
(c) Moral and practical application with examples.
(d) Conclusion

(B) Speaking Presentation
(a) Verbal clarity - pronunciation of words, voice modulation and projection.
(b) Presentation / Speaking style - mannerism, audience eye contact, ability to keep
the audience engaged.
(c) Confidence - gestures and expressions, stage courage

(C) Useful phrases and vocabulary
(a) It’s pleasure to see you all / I am happy to see you today/It’s good to see you
all here.
(b) Today’s topic is / My talk is about My topic is
(c) The purpose / aim of this speech.
(d) I will focus on one / two / three major issues.
(e) If you have any question, feel free to ask me.

7. Dos and Don’ts for delivering a speech. Add some more points.
 Dos Don’ts
 Talk slowly Don’t mumble
 Emphasize key words Don’t look up / down
 ........... ...............
 ................ .................
 ................ ............
 ............... .................
 ..................... ......................


1 comment:

  1. Your information is very useful thanks for sharing it.
    If you are preparing for the TOEFL exam then here we provide
    SOME TIPS TO PREPARE FOR TOEFL EXAMINATION

    ReplyDelete